नगर परिषद हिंगणघाट द्वारा संचालित

जी.बी.एम.एम. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, हिंगणघाट

आमची शाळा

इयत्ता ५ ते १०

इयत्ता ५ वी ते १० वी मराठी, हिंदी, सेमी इंग्रजी ही शिक्षणाची माध्यमं उपलब्ध आहेत. इयत्ता ५ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध केली जातात.

कनिष्ठ महाविद्यालय

११ वी १२ वी साठी विज्ञान ही शाखा उपलब्ध आहे. त्यात जनरल सायंस, कॉम्पुटर सायंस, इलेक्ट्रॉनिक्स, इंफॉर्मेशन टेक्नो. इ. उपशाखा आहेत.

मल्टीस्कील/ऑटो.

मल्टीस्कील व ऑटोमोबाईल हे अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. यात मल्टीस्कील या शाखेत मुलांसाठी व मुलींसाठी अनेक विषय उपलब्ध आहेत.

रेखाकला परीक्षा केंद्र

महाराष्ट्र राज्य कला संचालनालया द्वारे घेतल्या जाणार्‍या एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा इथे घेतल्या जातात. हे या परीक्षांचे खुप जुने केंद्र आहे.

बहूतेक विचारले जाणारे प्रश्न

या शाळेची स्थापना सुमारे १४० वर्षांपुर्वीची म्हणजेच इ.स. १८८० ची आहे. नेमकी तारीख सांगायची झाल्यास ९ एप्रिल १८८०. तेव्हा या शाळेचे नाव सर रॉबर्टसन हायस्कूल असे होते. ही राज्यातल्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक शाळा आहे. पुढे या मुळ शाळेचे विभाजन होऊन या शाळेचे नाव जी.बी.एम.एम. हायस्कूल व ज्यु.कॉलेज असे झाले.

हिंगणघाट येथिल मिल मालकांनी या शाळेसाठी इमारत बांधून दिली. तेव्हापासुन या शाळेचे नाव जी.बी.एम.एम. हायस्कूल अर्थात गंगाबाई बुलिकीदास मोहता नगर परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय असे पडले.

इथे इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. पाचवी ते दहावी मराठी, हिंदी व सेमी इंग्रजी ही शिक्षणाची माध्यमं उपलब्ध आहे. ११ वी व १२ वी विज्ञान शाखा आहे. यात जनरल सायंस, कॉम्पुटर सायंस, इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेकट्रॉनिक्स, इत्यादी शाखांतून शिक्षण उपलब्ध आहे. तसेच अलिकडे फिशरी सायंस हा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.

होय, इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत मोफत शिक्षण आहे. इयत्ता ५ ते ८ पर्यंत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके विनामुल्य दिल्या जातात. तसेच ५ ते ८ च्या सर्व मुल्यांना शासकीय योजनांमर्फत गणवेश मोफत दिला जातो. व ‘शालेय पोषण आहार दिला जातो. कनिष्ठ महाविद्यालयात शासकीय अनुदानीत व विनादानीत असे वर्ग आहेत. विनाअनुदनीत वर्गात प्रवेश ध्यावा लागल्यास संबंधीत अभ्यास  शाखेनुसार तसे शुल्क आकारले जाते.

इयाता ५ ते ९ साठी प्रवेश प्रक्रिया सरल व नि:शुल्क आहे. शाळा सोडल्याच्या मुळ दाखला, उत्तिर्ण इयत्तेची गुणपत्रिका, आधार, बॅन्क पासबूक छायाप्रत इ. कागदपत्रे पुरवणे आवश्यक आहे.  इयता ११ वी साठी गुणानुक्रमे यादी लावल्या जाते. त्यानुसार प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रीयेदरम्यान साधारणपणे तीन याद्या लावल्या जातात. काही जागा नगर परिषदेच्या कोट्यामधुन देखिल भरल्या जातात. हव्या असलेल्या अभ्यासक्रमानुसार संबंधीत शुल्क आकारले जाते.  

जनरल सायंस गृप, जनरल सायंस सामाजिक शास्त्रासोबत, जनरल सायंस आय. टी. सोबत, इलेक्टॉनिक्स, (विनाअनुदानित), कॉम्प्युटर सायंस (विनाअनुदानित), फिशरी सायंस, टेक्निकल, मल्टीस्किल/ऑटोमोबाईल जनरल सायंस सोबत. हे अभ्यासक्रम गट उपलब्ध आहेत.

तशी वयाची किंवा शिक्षणाची काही अट नाही. तरी इयत्ता सातवी नंतरच्या वोद्यार्थ्यांना ही परीक्षा व्यवस्थित देता येऊ शकेल, कारण तोपर्यंत विद्यार्थ्यांची चित्रकले सोबत पुरेशी ओळख होऊन चित्रकला साधनांवर बर्‍यापैकी हात बसलेला असतो. तसेच भूमितीचा पेपर सातवी -आठवीच्या विद्यार्थ्याना समाधानकारकपणे देता येईल. (लिंक)

इथे राष्ट्रभाषा परीक्षा केंंद्र व राज्य कलासंचालनालयाची रेखाकला परिक्षा केंद्र आहे. खेळामध्ये व्हॉलीबॉल, शुटींग बॉल, थ्रो बॉल, धर्नुर्विद्या हे खेळ प्रकार शिकवले जातात. या खेळात येथिल विद्यार्थीनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पोहचलेले आहेत. तसेच स्काऊट-गाईड, राष्ट्रीय छात्रसेना, सांस्कृतिक कार्यक्रम, रेखाकला परीक्षेसाठी नि:शुल्क वर्ग इत्यादि शिक्षणेतर उपक्रम चालवले जातात.

गंगाबाई बुलाकीदास मोहता नगर परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय